शाश्वत विकासासाठी विचारगट महत्वाचा

Submitted by admin on Mon, 02/01/2021 - 05:11

पुणे : “कोणत्याही देशाचे, संस्थेचे धोरण ठरवताना सर्वांगाने विचार व्हावा लागतो. त्या दृष्टीने समर्पित वृत्तीने विचार करणाऱ्या तटस्थ, तज्ज्ञ मंडळींचा विचारगट काम करत असतो. शाश्वत विकासासाठी असा विचारगट अतिशय महत्वाचा असून, भारतामध्ये राष्ट्रीय ते स्थानिक पातळीपर्यंत असे विचारगट स्थापन होण्याची गरज आहे,” असे मत स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर यांनी व्यक्त केले.